Donate
Latest News

संताजी समाज सेवा संस्था,काटोल-नरखेड संस्थेची सभा

-दिपावली स्नेहमिलन निमंत्रण - गुरुवार दिनांक 06 नोव्हेंबर 2025 सायं 6.00 ते 10.00 स्थळ : रॉक्स सेलीब्रेशन लॉन, बायपास रोड काटोल

Latest Activity
Our Members
View All
Management Team
View All
About Us

जय संताजी...........समग्र तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या पावन स्मृतीला वंदन .... अत्यंत प्राचीन असलेला आपला समाजाचा अनेक प्राचीन शिलालेख आणि धार्मिक ग्रंथांमध्ये 'तैलिक' म्हणुन उल्लेख आढळतो, ज्यामुळे तेली समाजाचे प्राचीनत्व सिद्ध होते. समाजाने केवळ पारंपरिक व्यवसायावर अवलंबून न राहता, शिक्षण, राजकारण, वैद्यकीय, अभियांत्रिकी आणि इतर व्यवसायांमध्ये महत्त्वपूर्ण प्रगती केली आहे. तेली समाजाचा इतिहास हा श्रम, उद्योग आणि सामाजिक योगदानाचा आहे, जो भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.

इतिहासात डोकावुन पाहीले तर अनेक ठिकाणी समाज बंधु केवळ तेल व्यावसायिक नव्हते, तर ते श्रीमंत व्यापारी आणि सावकार म्हणूनही प्रभावी होते. अनेक मंदिरांचे आणि धर्मशाळांचे बांधकाम केल्याचे पुरावे आजही आढळतात.

संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज , महाराणा प्रताप यांचे खजिनदार आणि महान दानशूर दानवीर भामाशाह समाज भुषण प्रसिद्ध भारतीय खगोलशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ मेघनाद साहा तसेच  अलीकडच्या काळातील भारताचे विद्यमान पंतप्रधान मा.ना.नरेंद्रजी मोदी हे सर्व आपल्या समाजाचे प्रेरणास्त्रोत आहेत.

संस्थेच्या माध्यमातुन करण्यात येणारे भविष्यातील प्रकल्प

 "संताजी समाज सभागृह"

संताजी समाजसेवा संस्थेच्या वतीने समाजाच्या गरजा लक्षात घेऊन काटोल जवळच्या डोंगरगाव येथे एक सुसज्ज "संताजी समाज सभागृह" उभारण्याचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या सभागृहामुळे आपल्या समाजातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी एक हक्काचे आणि सोयीस्कर ठिकाण उपलब्ध होणार आहे. विवाह समारंभ, शैक्षणिक शिबिरे, आरोग्य तपासणी केंद्र आणि सामुदायिक बैठकांसारख्या अनेक उपक्रमांसाठी या सभागृहाचा उपयोग होईल, ज्यामुळे संपूर्ण समाजाला मोठा लाभ मिळेल. समाजाच्या एकत्रित वाढीसाठी आणि उत्कर्षासाठी एक केंद्रस्थान निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. हा केवळ संस्थेचा प्रकल्प नसून, संपूर्ण समाजाचा सामूहिक प्रयत्न आहे. त्यामुळे आपला सक्रिय सहभाग नोंदवून या समाजोपयोगी कार्याला यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे.आपल्या देणगीची आम्ही कृतज्ञतापूर्वक नोंद घेऊ.

 कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदीर बांधकाम

आपल्या  समग्र तेली समाजाचे श्रद्धास्थान, कुलस्वामिनी आई तुळजाभवानी  चे भव्य मंदिराचे बांधकाम करण्याचाही संकल्प आम्ही हाती घेतला आहे.

संकल्पीत मंदिर केवळ एक इमारत राहणार नसून, ते आपल्या समाजाच्या एकतेचे, श्रद्धेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक बनेल. या मंदिरातून येणाऱ्या पिढ्यांना आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आणि संताजी महाराजांची शिकवण मिळेल.

आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांचे काटोल येथे संताजी ट्रस्ट च्या माध्यमातुन उभारण्यात आलेले सुंदर मंदीर असल्यामुळे पुन्हा दुस-या मंदीराचा प्रकल्पाचा यात सामावेश करण्यात आलेला नाही.

या पवित्र आणि महत्त्वाकांक्षी कार्यात समाजातील प्रत्येक घटकाचा सहभाग अत्यंत आवश्यक आहे. मंदिराच्या उभारणीसाठी आणि संपूर्ण प्रकल्पासाठी  मोठ्या निधीची आवश्यकता असणार आहे.

 महिला स्वावलंबन शिवणकाम प्रशिक्षण व गारमेंट उत्पादन प्रकल्प

 

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना

  1. व्यावसायिक शिवणकाम प्रशिक्षण देणे,
  2. प्रशिक्षण घेतलेल्या समाजातील महीलांना गारमेंट निर्मिती प्रकल्पात रोजगार उपलब्ध करून देणे,आणि स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे.
  3. या प्रकल्पांतर्गत एकूण 100 महिलांना निवडून 6 महिन्यांचे शिवणकाम व गारमेंट उत्पादन प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पात्र महिलांना संस्थेच्या गारमेंट उत्पादन केंद्रात स्वयंरोजगाराच्या स्वरूपात काम दिले जाईल. प्रशिक्षणानंतर संस्थेच्या सहकार्याने स्थानिक बाजारपेठ व ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठी वस्त्र निर्मिती केली जाईल — जसे की  स्कूल युनिफॉर्म लेडीज व कुर्ती वेअर बाळांचे कपडे इतर स्थानिक गरजांनुसार वस्त्रे

 महिला बचतगट निर्मिती व सबलीकरण उपक्रम

स्थानिक पातळीवर महिला सक्षमीकरण व आर्थिक उन्नती करणे स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर महिलांचा समाज निर्माण व्हावा तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळावी ,समाजात महिलांचे नेतृत्व व निर्णयक्षमतेत वाढ व्हावी म्हणुन  संस्थेतर्फे महिला बचतगट निर्मिती व सबलीकरण उपक्रम  राबवण्यात येणार असुन

  1. समाजातील महिलांना बचतगट तयार करण्याबाबत मार्गदर्शन व प्रशिक्षण देणे.
  2.  शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन अर्ज प्रक्रिया सुलभ करणे.
  3. गटांना बँक लिंकिंग, कर्ज प्रस्ताव तयार करणे, व लघुउद्योग सुरू करण्यासाठी सहाय्य देणे.
  4. उद्योग प्रशिक्षण शिबिरे, हातगुणविकास कार्यशाळा (उदा. अगरबत्ती, पापड, मसाले, शिवणकाम, इ.) आयोजित करणे.
  5. यशस्वी गटांना पुरस्कार / प्रमाणपत्र देऊन प्रोत्साहन देणे.

यामुळेच समाजातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे. महिलांना शासनाच्या विविध आर्थिक, सामाजिक व स्वयंरोजगार योजनांशी जोडणे.बचत, कर्ज व्यवहार व लघुउद्योग यांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण साध्य करणे.एकत्रित प्रयत्नांतून सामाजिक व आर्थिक विकास घडवणे शक्य होईल.

 शेतकरी बचतगट उपक्रम

लघु आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणे, तसेच शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ संगठित पद्धतीने मिळवून देण्यासाठी  संस्थे मार्फत समाजातील शेतक-यांचे बचतगट स्थापन करुन त्यांना मदत करणे शक्य होईल.

 

 शिक्षण आणि करिअर (Education and Career)

  1. शैक्षणिक मार्गदर्शन: समाजातील विद्यार्थी आणि तरुणांसाठी करिअर मार्गदर्शन, उच्च शिक्षणाचे पर्याय, शिष्यवृत्ती आणि सरकारी योजनांची माहिती देणारे शिबिर आयोजित करणे.
  2. स्पर्धा परीक्षांची तयारी: UPSC, MPSC, बँकिंग, इंजिनिअरिंग अशा स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक वर्ग (Coaching) किंवा अभ्यासिका (Study Centre) सुरू करणे.
  3. आर्थिक साहाय्य: गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत किंवा कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी बँकाशी संपर्क साधुन त्यांना मदतमिळवुन देणे.

 

 राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व (Political and Social Representation)

 

राजकीय जागृती, मतदान आणि राजकीय प्रक्रियेतील सहभागाबद्दल  समाजात जागृती करणे.

स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि इतर संस्थांमध्ये समाजाच्या प्रभावी प्रतिनिधित्वासाठी समाजात जागृती करणे.

 संस्थेच्या समाजोपयोगी कार्यात आपण खालीलपैकी कोणत्याही एका प्रकारे सहभागी होऊ शकता:

  1. सदस्य म्हणून संस्थेच्या कार्यात सक्रिय सहभाग घेणे.
  2. देणगीदार म्हणून संस्थेच्या कार्यासाठी आर्थिक मदत करणे.
  3. स्वयंसेवक म्हणून: आपल्या वेळेनुसार आणि कौशल्यानुसार संस्थेच्या उपक्रमांमध्ये मदत करणे.
  4. संस्थेला दिलेली देणगी सामाजिक कार्यासाठी वापरली जाईल, याची आम्ही हमी देतो. चला, एकत्र येऊन समाजाचा विकास करूया!

 संस्थेत देणगी किंवा सभासद वर्गणी देण्यासाठी

  1. संस्थेचे बँक खात्याचा तपशील
  2. ACCOUNT NAME : SANTAJI SAMAJ SEVA SANSTHA KATOL NARKHED
  3. ACCOUNT No.: 60549414422
  4. IFSC: MAHB0000843
  5. BANK : BANK OF MAHARASHTRA ,
  6. Branch: KATOL

 संस्थेचे सभासद होण्यासाठी

    1. संस्थेच्या उपविधीतील नियम क्रं.5 अन्वये संस्थेचा आजीवन सदस्य होण्यासाठी संस्थेला किमान 51000/- (एकावन्न हजार रुपये) आणि त्याहून अधिक आजीवन सदस्यता शुल्क आणि प्रवेश शुल्क म्हणून 251 रुपये (दोनशे एकावन्न रुपये) भरून, "संताजी समाज सेवा संस्था काटोल-नरखेड काटोल जिल्हा नागपूर " मध्ये प्रत्यक्ष अर्ज करणाऱ्या व्यक्ती शुल्क भरून. संस्थेचा आजीवन सदस्य होऊ शकतो.
    2. तसेच संस्थेचा सर्वसाधारण सदस्य होण्यासाठी संस्थेला किमान 11000/- (अकरा हजार रुपये) आणि त्याहून अधिक सर्वसाधारण सदस्यता शुल्क आणि प्रवेश शुल्क म्हणून 251 रुपये (दोनशे एकावन्न रुपये) भरून, "संताजी समाज सेवा संस्था काटोल-नरखेड काटोल जिल्हा नागपूर " मध्ये प्रत्यक्ष अर्ज करणाऱ्या व्यक्ती शुल्क भरून. संस्थेचा सर्वसाधारण सदस्य होऊ शकतो.
    3. संस्थेचे सदस्यत्व 18 वर्षे व त्या पेक्षा जास्त वय असलेल्या आणि संस्थेच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी खुले आहे.

 संस्थेतील निवडणुक प्रक्रीया

(संस्थेच्या उपविधीतील तरतुदी नुसार)

 

  •  वडणुक अधिका-याची नियुक्ती कार्यकारी मंडळाने (30) तिस दिवसा पुर्वी करावी.2) निवडणुक सर्वसाधारण सभेत गुप्तं मतदान पदधतीने घेण्यात यावे.3) निवडणुक तारखेची सुचना 15 (पंधरा) दिवसा पुर्वी लेखी सुचने व्दारे करण्यात यावी.4) संस्थेची कोणत्याही प्रकारची बाकी येणे असल्यास किंवा संबधीत सदस्याने नियमबाहयं व्यवहार केल्यास अथवा त्यास कोणत्याही कारणास्तवं बडतर्फ केले असल्यास निवडणुकी साठी तो सदस्यं अपात्र ठरविण्यात यावा. कार्यकारी मंडळांची रचना पुढील नुसार असावी : "संताजी समाज सेवा संस्था काटोल-नरखेड" चे व्यवस्थापन व प्रशासन  संस्थेच्या निर्वाचीत कार्यकारी मंडळा समितीमार्फत केले जाईल प्रत्येक कार्यकार मंडळाचा कार्यकाळ ५ (पाच) वर्षाचा असेल. संताजी समाज सेवा संस्था काटोल-नरखेड च्या कार्यकारी मंडळात संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी व कामाची सर्व व्यवस्था करण्यासाठी एकूण २१ (एकवीस) सदस्य असतील. त्याची रचना पुढीलप्रमाणे असेल.यापैकी 'आजीवन सदस्य' आणि 'संस्थापक आजीवन सदस्य' या सदस्य प्रवर्गातून 15 प्रतिनिधीची निवड करण्यात येणार आहे. उर्वरित 6 सदस्यांची निवड 'सर्वसाधारण सदस्य' प्रवर्गातून केली जाणार आहे. 21 निवडून आलेल्या प्रतिनिधींमधून संस्थेचे कार्यकारी मंडळ व अधिकारी पुढीलप्रमाणे स्थापन केले जातील.

 (अ) अध्यक्ष-१ (एक)

(ब) उपाध्यक्ष-२ (दोन)

(ड) सचिव-१ (एक)

(ड) सहसचिव-२ (दोन)

(छ) कोषाध्यक्ष -1 (एक)

(ओ) सह-कोषाध्यक्ष-2 (दोन)

(अ) कार्यकारिणी सदस्य एकूण - 12 (बारा)

वरीलप्रमाणे स्थापन केलेले कार्यकारी मंडळ आपापसातून पदाधिकाऱ्यांची निवड करेल. कार्यकारी मंडळाच्या कोणताही सदस्य मृत्यु पावल्यास त्याचा वारसदार हा संस्थेत अशा मृत्यु पावलेल्या सदस्याची जागा घेईल. कार्यकारी मंडळ ही रिक्त जागा भरू शकते. कार्यकारी मंडळाने नियुक्त केलेली कोणतीही व्यक्ती उर्वरित कालावधीसाठीच पदावर राहील.

 संस्थेची वेबसाईट आणि मोबाईल ॲप

संताजी समाज सेवा संस्था,काटोल नरखेड नोंदणी क्रमांक NGP/0000842/2025 F-0040610(NGP) या संस्थेत सभासद नोंदणी सुरु झाली आहे यासाठी संस्थेव्दारा वेबसाईट सुरु करण्यात आलेली आहे कृपया संस्थेच्या वेब साईटला भेट दया https://santajisamajseva.in किंवा पुढील साईट ला भेट दया  https://santajisamajseva.in/users-apply-form.php लगेचच मोबाईल ॲप ची देखील लिंक देण्यात येणार आहे.

 

 संस्थेतील विवीध समीत्या

  1. वित्त आणि लेखा समिती
  2. शिक्षण आणि करिअर
  3. गुणवंत विदयार्थी शिष्यवृत्ती समिती
  4. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम समिती
  5. आरोग्य आणि कल्याण समिती
  6. तक्रार आणि वाद निवारण समिती
  7. वैवाहिक आणि जनसंपर्क समिती
  8. युवा आणि स्वयंसेवक समिती
  9. महिला मंडळ/महिला विकास समिती
  10. वधू-वर सूचक आणि विवाह मार्गदर्शन समिती
  11. बांधकाम आणि तांत्रिक समिती
  12. खरेदी समिती
  13. जनसंपर्क आणि प्रसिद्धी समिती
  14. मंदीर बांधकाम समीती
  15. महीला बचतगट समीती
  16. शेतकरी बचतगट समीती
  17. शिवणकाम प्रशिक्षण व गारमेंट उत्पादन प्रकल्प समीती
  18. गाव स्तरावर समाजाच्या विवीध समीत्यांची रचना करणारी समीती
  19. गाव स्तरावर कार्यक्रमांची योजना समीती
  20. राजकीय आणि सामाजिक प्रतिनिधित्व समीती  
  21. केन्द्र व राज्य सरकार च्या योजनांची संस्थे मार्फत माहीती समीती
  22. कौशल्य विकास प्रशिक्षण समीती
  23. समाज बंधुसाठी रोजगार मेळावे आयोजन समीती
  24. व्यसनमुक्ती अभियान समीती

 संस्थेची मुख्य पुढील उद्दिष्टे आहेत:

1. सत्संग, व्याख्याने सारखे धार्मिक कार्यक्रम आयोजित करणे.

2. समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबवणे, सांस्कृतिक सभागृह (मंगल कार्यालय) चालवणे आणि ते कमी खर्चात समाजाला उपलब्ध करून देणे.

3. समाजाच्या विकासासाठी, गरीब बांधवांसाठी सामूहिक विवाह समारंभ, वर-वधू परिचय समारंभ  आयोजित करणे.

4. समाजातील सदस्यांसाठी वैद्यकीय शिबिरे आयोजित करणे आणि समाजातील गरीब सदस्यांना आर्थिक मदतीसाठी योजना तयार करणे.

5. राजकीय क्षेत्रात समुदायाचे योगदान वाढविण्यासाठी समुदायाच्या सदस्यांना राजकीय मार्गदर्शनासाठी कार्यशाळा आयोजित करणे.

6. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रासह शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण आणि व्यवस्थापनावर काम करणे.

7. "लक्ष्यित प्रकल्प" पद्धतीने वंचित, अपात्र, मागास आणि पोहोच नसलेल्या क्षेत्रांपर्यंत पोहोचणे.

8. समाजातील गरीब घटकांच्या, विशेषतः महिला आणि मुलांच्या, त्यांच्या राहणीमानात सुधारणा आणि त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी काम करणे.

9. समाजातील वंचित घटकांना आवश्यक कृती करून मूलभूत गरजा पुरवणे आणि व्यावसायिक अभ्यासक्रम, माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रम आयोजित करणे आणि लोकांना स्वावलंबी बनवण्यासाठी आणि त्यांचा आर्थिक विकास सक्षम करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणे.

10. मानवी हक्कांच्या व्यापक संदर्भात कौटुंबिक हक्क, बाल हक्क आणि महिला हक्कांच्या क्षेत्रात अभ्यास, संशोधन करणे आणि तज्ञता प्रदान करणे.

11. सामाजिक आणि विकासाशी संबंधित विषयांच्या संशोधन, प्रशिक्षण आणि उपयोजित पैलूंशी संबंधित आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि स्थानिक हिताच्या सध्याच्या संशोधन विषयांवर आणि इतर विषयांवर चर्चासत्रे, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, परिसंवाद, व्याख्याने, वादविवाद, पॅनेल चर्चा, परिषदा आणि अभ्यासक्रम आयोजित करणे.

12. समाजाच्या उद्दिष्टांना प्रोत्साहन देणारे डेटाबेस, नकाशे, वेब पेजेस आणि इतर ऑनलाइन साधने विकसित करणे.

13. सर्व क्षेत्रातील तांत्रिक आणि औपचारिक शिक्षणासाठी आणि तांत्रिक ज्ञानाच्या विकासासाठी अभ्यासक्रम चालवणे आणि आयोजित करणे.

14. संस्था, ट्रस्ट इत्यादींच्या मदतीने शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था स्थापन करणे, चालवणे आणि व्यवस्थापित करणे आणि संगणक अभ्यासक्रम आणि तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण आयोजित करणे. आणि या उद्देशाने अखिल भारतीय स्तरावर गावे, जिल्हे, राज्यात संस्था, संगणक केंद्रे स्थापन करणे.

15. समाजातील गरीब, अनाथ आणि अपंग व्यक्तींना मदत करणे आणि प्रशिक्षित करणे.

16. खेळांना प्रोत्साहन देणे, खेळ आणि खेळांच्या सुविधा प्रदान करणे, स्पर्धा आणि क्रीडा-मेळावे आणि कार्यक्रम आयोजित करणे.

17. अनाथाश्रम आणि महिला-आश्रम चालवणे आणि व्यवस्थापित करणे.

18. सामान्य जनता आणि अपंग लोकांना वैद्यकीय सुविधा प्रदान करणे, रुग्णालये चालवणे आणि देखभाल करणे.

19. समाजाच्या मद्यपानाच्या सवयीबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि ड्रग्ज आणि अंमली पदार्थ इत्यादींच्या वाईट सवयी दूर करण्यासाठी काम करणे

20. समाजाच्या उन्नती साठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या योजना राबवणे.त्याचा लाभ समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न करणे

21. महिला निवारागृहे, युवक कल्याण योजनांची अंमलबजावणी.

President Message

संताजी समाज सेवा संस्था,काटोल नरखेड नोंदणी क्रमांक NGP/0000842/2025 F-0040610(NGP) या संस्थेत सभासद नोंदणी सुरु झाली आहे यासाठी संस्थेव्दारा वेबसाईट सुरु करण्यात आलेली आहे कृपया संस्थेच्या वेब साईटला भेट दया web site https://santajisamajseva.in किंवा पुढील साईट ला भेट दया  https://santajisamajseva.in/users-apply-form.php

संस्थेचे बँक खाते सुरु झाले असुन त्याचा तपशील पुढील प्रमाणे आहे कृपया सर्वांनी आप-आपली सदस्यता फी त्वरीत खाली दर्शवलेल्या तपशीला प्रमाणे खात्यात जमा करावी जमा केलेली पावती ग्रृप वरच शेअर करावी लवकरच आपल्या संस्थेची वेबसाईट तसेच मोबाईल ॲप सुरु करुया धन्यवाद.....

ACCOUNT NAME : SANTAJI SAMAJ SEVA SANSTHA KATOL NARKHED

ACCOUNT No.: 60549414422

IFSC: MAHB0000843

BANK : BANK OF MAHARASHTRA ,

Branch: KATOL

 

संस्थेच्या सर्व संस्थापक आजीवन सदस्यांनाविनंती करण्यात येते की आपण आपली सभासद फी रु 31,000/- अक्षरी एकतीस हजार त्वरीत उपरोक्त खात्यात जमा करावी.

 

 

संस्थेच्या उपविधीतील नियम क्रं.5 अन्वये संस्थेचा आजीवन सदस्य होण्यासाठी संस्थेला किमान 51000/- (एकावन्न हजार रुपये) आणि त्याहून अधिक आजीवन सदस्यता शुल्क आणि प्रवेश शुल्क म्हणून 251 रुपये (दोनशे एकावन्न रुपये) भरून, "संताजी समाज सेवा संस्था काटोल-नरखेड काटोल जिल्हा नागपूर " मध्ये प्रत्यक्ष अर्ज करणाऱ्या व्यक्ती शुल्क भरून. संस्थेचा आजीवन सदस्य होऊ शकतो. तसेच संस्थेचा सर्वसाधारण सदस्य होण्यासाठी संस्थेला किमान 11000/- (अकरा हजार रुपये) आणि त्याहून अधिक सर्वसाधारण सदस्यता शुल्क आणि प्रवेश शुल्क म्हणून 251 रुपये (दोनशे एकावन्न रुपये) भरून, "संताजी समाज सेवा संस्था काटोल-नरखेड काटोल जिल्हा नागपूर " मध्ये प्रत्यक्ष अर्ज करणाऱ्या व्यक्ती शुल्क भरून. संस्थेचा सर्वसाधारण सदस्य होऊ शकतो. संस्थेचे सदस्यत्व 18 वर्षे व त्या पेक्षा जास्त वय असलेल्या आणि संस्थेच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसाठी खुले आहे.

Our Objectives
Photo Gallery
View All
What People Says
Locate us